आधुनिक पद्धतिने शेती
शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे
सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेती करण्यासाठी सर्वांना मोठा आळस आला आहे कारण आत्ताची नवीन पिढी ही नोकरीच्या मागे धावत आहे पण शेती नसेल तर आपण एक दिवशी अन्नधान्यासाठी देखील राहणार नाही व्यवसायासाठी शेती करणे खूप महत्त्वाचे आहे शेतीवर खूप असणारे व्यवसाय चालतात ते व्यवसाय चालवणे खूप गरजेचे आहे शेतीवर खूप सारे जोडधंदे अवलंबून आहे जसे की रेशीम उत्पादन कुक्कुटपालन व्यवसाय मत्स्य व्यवसाय असे अनेक व्यवसाय आहेत जे की शेतीवर अवलंबून आहेत
पारंपारिक पद्धतीने शेती करण्याला शेतकरी मेटाकुटीला आला आहे आपण पहिल्यापासून पारंपारिक शेती करतो आणि आधुनिक शेतीला पारंपारिक शेतीची जोड देऊन शेती केली पाहिजे आज आपण पाहत आहोत की शेतीचे नवनवीन युग आले आहेत आणि शेतीकडे जास्त दुर्लक्ष होत आहे शेतीचे आलेले नवीन युग हे खूप महत्त्वाचे आहे आपण पहिल्यापासून पारंपारिक पद्धतीने शेती करत आहोत पण आतापासून आपण आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी कारण दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत चाललेली आहे
आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी
पिकांना पाणी व सूर्यप्रकाशा अल्प प्रमाणात लागते सेंद्रिय शेती करणे शक्य ग्रोटेनर पद्धतीने पिकावर येणारी कीड व रोग यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची ग्रेटर पद्धत विकसित केली गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत होते आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढेच पाणी त्या पिकाला व अशा अल्प प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतोआणि पाण्यामुळे पिकाची झपाट्याने गतीने वाढ होते
शेती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करावी पेरणीपूर्वी शेतीची ती योग्य ती मशागत करावी शेतीची माती परीक्षण करून घ्यावे आधुनिक शेतीमध्ये रासायनिक तसेच सेंद्रिय खत पेरावे नवीन सुधारित वाहनाचा प्रयोग करावा रोप किडीचे एकात्मिकपणे संगोपन करावे
रोग किंवा किडी प्रतिपादक वापरावे जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर न करता जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरावी रासायनिक खतामुळे जमिनीचा कस कमी होतो तर सेंद्रिय खतामुळे वाढतो
आधुनिक पद्धतीने मुळ्याची शेती
जेव्हा आपण मुळ्याचे पीक घेतो तेव्हा मुळ्याची लागवड सपाट किंवा सरी वाफ्यात करावी आणि आपल्याला माहिती आहे मुळ्याचे पीक हे कमी कालावधीत येते आणि जर का या उत्पादनावरून जास्त उत्पादन मिळायचे असेल तर त्या पिकाला खत टाकावे लागते व काही कालावधीत फवारणी पण करावी मुळ्याच्या पिकाला नत्र, स्फुरद ,पालाश हे खथे टाकली पाहिजेत मुळ्याच्या वाढीसाठी जमीन ही सतत ओलसर असली पाहिजे आणि कोरड्या जमिनीत मुळ्याची लागवड करू नये बियांची पेरणी केल्यानंतर हलकेसे पाणी द्यावे आणि हिवाळ्याच्या दिवसात मुलांना आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर पाणी द्यावे आणि जर का मुळ्यावर कीड किंवा रोग पडला तर फवारणी करावी आणि जास्त करून मुळ्यावर रोग पडणारा कीटक म्हणजे काळी आळी मुळ्याची पूर्णपणे वाढ झाल्यावर हा काळेआळीचा रोग पडतो ह्या काळ्या आळ्या मुख्याता पानावर पडतात आणि पाने खातात त्यामुळे पानांना छिद्र पडते आणि त्या मुळ्याच्या पिकाला पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे काळी आणि हा रोग पडला की लगेच फवारणी करावी
आपली सगळी शेती ठिबक सिंचनाखाली करा
लहान नळीद्वारे रोपांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचण्याची पद्धत म्हणजे ठिबक सिंचन पद्धत होय या आधुनिक ठिबक सिंचन प्रणाली मुळे पाण्याची खूप बचत होते आणि हे ठिबक सिंचन खूप खर्चिकही नाही आणि जर का एखादे पिक घ्यायचे असेल आणि पाण्याची कमतरता असेल तर या ठिबक सिंचनामुळे ते पाणी मुबलक प्रमाणात रोपाच्या मुळापर्यंत जाऊन अगदी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून देऊ शकते आणि पाणी वाया न जाता त्याचा पुरेपूर उपलब्ध आणि उपयोग शेतकऱ्याला कसा होईल हे आपल्याला ठिबक सिंचनांकडून कळते तसे आपण विचार केला तर ठिबक सिंचन खूप उपयुक्त आहे त्यामुळे पाण्याची खूप बचत होते आणि झाडांना हवे तेवढेच पाणी उपलब्ध होते ते शक्य आहे फक्त ठिबक सिंचनामुळे .
जमीन तर चढउताराचे असून मध्यम स्वरूपाची होती आणि शेतात विहीर असूनही पाणी देण्यास अडचण व्हायची यातून केवळ दोन एकरच क्षेत्र पाण्याखाली जात होते आणि पाणी भरपूर असूनही शेतीला पाणी देता येत नव्हते आणि नंतर मग एकच तंत्र आवडले आणि ठिबक सिंचन लावले आता संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन केले आणि सगळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळू लागले.
तुषार सिंचन
तुषार सिंचन म्हणजे पाण्याच्या दाबाचा वापर करून सर्वत्र ठिकाणी पाण्याचा फवारा करून सर्व ठिकाणी उपलब्ध व कमी प्रमाणात पाणी म्हणजे तुषार सिंचन होय यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकार गतीने फिरते आणि सर्वत्र समप्रमाणात पाणी फवारते आपण जर विचार केला ना तर तसे तुषार सिंचनाचे खूप फायदे आहेत ते फायदे आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत . 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
तुषार सिंचनाचे फायदे :-
2)प्रवाही सिंचनापेक्षा ही सिंचन क्षमता जास्त असते
3) तसेच सगळीकडे समप्रमाणात पाणी सोडण्याचे काम तुषार सिंचनाचे असते
4) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांसाठी वापरली जाते
5) पाण्याची 25 ते 30 टक्के बचत होते
6) आपल्याला जसे पाहिजे तसे सर्व ठिकाणी पाणी देता येते
7) पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढे पाणी देता येते
8) ते पाणी पिकावर खूप प्रेशरने पडते पावसासारखे पडते त्यामुळे किडी रोग निघून जातात
9) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात
10) जर पिकाला खत टाकायची आहे असले तर या तुषार सिंचनाद्वारे टाकता येतात व त्याच्या शहरामुळे ते खत रोपाच्या बुडाला जाऊन अधिक कार्यक्षम बनते
11) ठिबक सिंचनापेक्षा दर एकरी खर्च कमी येतो
12) जमीन सपाट करण्याची गरज नाही
13) आणि मगरीवरचा खर्च बचत होते
14) पिक उत्पादना दहा ते पंधरा टक्के वाढ होते
योग्य तो आराखडा तयार करून योग्य तितके शक्तीचा वापर करून आणि आणि दाबाचा पंपसेट वापरल्यास हे तुषार सिंचन खूप उपयुक्त ठरते यासाठी स्प्रिंकल उपयुक्त असते स्प्रिंकल ला एक छोटा आणि मोठा नोझल जोडलेला असतो मोटो नोझल वर्तुळाकार आणि दूरच्या पिकांना पाणी देण्याचे काम करतो तर छोटा नोजल वर्तुळाकार फिरून जवळच्या पिकांना पाणी देण्याचे काम करतो
आणि शेतकऱ्याला जर जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन नक्की करावे






~2.jpg)
