मुंबई : शिवसेना पक्ष हा बाळासाहेब गटाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू आहे.शुक्रवारच्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाले, निवडणूक ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांचा आहे. जे बाहेर पडले आहेत, ते गद्दार आहेत. त्यांची शिवसेना कधीच होऊच शकत नाही. देशात सत्यमेव जयते आहे, त्यामुळे सत्याचा म्हणजे आमचाच विजय होणार हे निश्चित आहे. फक्त हा विषय किती दिवस प्रलंबित ठेवणार आणि लांबवणार एवढाच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे आयोगाला लेखी उत्तर आम्ही देऊच; पण गेली सहा ते सात महिने घटनाबाह्य सरकार स्थापन झाले आहे. देशात असे कधीही झाले नव्हते. कायदे तोडून मोडून हे सत्तेत आले आहेत. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी देशाचे, राज्याचे आणि जनतेचे नुकसान होत आहे. असा प्रकार देशाने यापूर्वी कधीच बघितला नव्हता, असेही ते म्हणाले. //