sharad pawar news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ विरुद्ध विधान केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळाचा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ जेलमध्ये गेले असते. असे विधान केलेले आहे.
तेलगी प्रकरणावरून शरद पवारांनी आपल्याकडून राजीनामा घेतला पण तेलगी प्रकरणात आपणच विरोध म्हणून कारवाई केली होती. असे अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधल्या सभेत स्पष्ट केले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांना उत्तर दिले.
मी लढण्यासाठी तयार आहे तुम्ही पण राहा आपण जी लढत आहोत ती विचारांची लढाई आहे मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नका लोकांची शक्ती ही आपल्या मागे आहे. आपल्या पक्षावर टीका करणारे अजित पवार गटांकडे लक्ष देऊ नका, असे पवार यांनी म्हटले आहे.
