श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या
म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन
एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही
परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. पुढील तीन महिन्यांत जम्मू-काश्मीरची सुरक्षा आणखी भक्कम केली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष कृती योजना आखल्याचे अमित शाह म्हणाले. दरम्यान, राजौरीमध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे तिथे झालेल्या हल्ल्यातील पीडितांची भेट घेण् जाऊ शकलो नाही. परंतु पीडितांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून चर्चा केली, अशी कबुली शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राजौरी हल्ल्यातील पीडितांनी दहशतवादाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे आपणास सांगितले. त्यांची भावना सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले.
