दावोस: भारत तसेच देशाचे सरकार व्यवसायासाठी सदैव तयार आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी सांगितले. त्यांनी परदेशी कंपन्यांना देशाच्या अफाट क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या वार्षिक बैठक - २०२३ च्या पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि सल्लागार फर्म डेलॉइट यांनी आयोजित केलेल्या सत्राला त्या संबोधित करत होत्या.
स्मृती इराणी म्हणाल्या की,महिलांना खूप फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील NDI प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय आम्ही उद्योग आणि इतर सर्वांसोबत एकत्र काम करण्यावर आमचा विश्वास आहे. भारत आयुष्मान भारतच्या रूपाने जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा चालवतो. या अंतर्गत १० कोटी कुटुंबे येतात. भौगोलिक सीमा ओलांडून आरोग्य सुविधा पुरवण्यात येते.
या योजनेचा करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. जग जेव्हा करोडो लोकांना पुन्हा कौशल्य देण्याची गरज बोलतो, तेव्हा केवळ भारतच ते लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. भारताने स्वदेशी कोविड लस विकसित करण्यासाठी इतर देशांसोबत सहकार्य केले; परंतु ते व्यावसायिक हेतूने नव्हे तर मदत करण्याच्या भावनेने केले गेले, असे सांगत भारताचा जगातील दृष्टिकोन कसा आहे, हेही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले.
