मुंबई : एसटी महामंडळाला विविध सरकारी पेट्रोलियम कंपन्यांतर्फे पुरवण्यात येणाऱ्या डिझेलसाठी खासगी पेट्रोल पंपांवरील डिझेलच्या दराच्या तुलनेत लिटरमागे अतिरिक्त २२ ते २३ रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या एसटीला आणखी संकटात ढकलले गेले आहे.
दर
म्यान, सार्वजनिक परिवहन सेवा असताना केंद्राची मालकी सरकारी आणि खासगी तेलकंपन्यांच्या दरात तफावत ॥ महामंडळाचा खासगी खरेदीचा निर्णय असलेल्या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून एसटीला इतरांहून स्वस्त डिझेल पुरवण्याऐवजी महाग दराने कसे पुरवले जाते? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी असणाऱ्या लालपरी एसटीचे कोरोना काळात उत्पन्न घटले. त्यानंतर एसटी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटीला सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची वेळ आली एसटी महामंडळाने विभागात डिझेल भरण्यासाठी आगारातील बसेसच्या वेळापत्रकाचा विचार करून नजीकच्या सोयीस्कर पंपाची निवड करण्यात यावी, त्यामुळे डिझेल अभावी बसेस बंद राहण्याचा धोका टळेल, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ज्या मार्गावर जादा फेऱ्या आहेत, अशा मार्गांवरील पंपांची निवड करण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
अशातच आता ऑईल कंपन्यांकडून एसटीला महागड्या दराने डिझेल विक्री केल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाच्या १६ हजार बसेसद्वारे ४५ लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे.
त्यासाठी एसटीला दररोज १४ लाख लिटर डिझेल लागते. घाऊक दराने हे डिझेल मिळण्यासाठी मे. इंडियन ऑईल तसेच भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांबरोबर करार करण्यात आला आहे. या कंपन्यांबरोबर ११ जानेवारी २०१९ ते १० जानेवारी २०२२ पर्यंत घाऊक डिझेल खरेदीचा करार झाला होता. त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मे. इंडियन ऑईल कंपनीने महामंडळा घाऊक दराच्या नावाखाली दिलेल्या दरपत्रकाची तुलना करता हा दर खासगी पेट्रोल पंपावरील दरापेक्षा प्रतिलिटर २२.६१ रुपये जादा असल्याचे उघडकीस आले आहे. घाऊक आणि किरकोळ विक्री दरात असलेल्या फरकामुळे महामंडळाने या कंपन्यांकडून डिझेल न घेता खासगी पेट्रोल पंप चालकांकडून डिझेल भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटीची बचत होत आहे.
