सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कोरोनाचा असर

 कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचे, जादा खर्चाचे; त्यातल्या भ्रष्टाचाराचे अनेक आकडे समोर आले. या काळात आरोग्यव्यवस्थेवर आलेला ताण आणि त्यातील कमतरतेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यांवरूनही बरीच भवति न भवति झाली. पण, त्या दोन वर्षांत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवल्याने विद्यार्थ्याचं किती नुकसान झालं याची आकडेवारी समोर आली नव्हती. बुधवारी जाहीर झालेल्या 'असर' अहवालाने आपल्या भावी पिढीवर त्या 'लॉकडाऊन'चा नेमका काय असर पडला, हे आता समोर आले आहे. 'असर'चा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो आणि त्यातून आपल्या शिक्षणव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली जातात. ज्यांना ही आकडेवारी अडचणीची वाटते किंवा ज्यांना आपल्या बेफिकीरीचा पुरावा म्हणून तो पाहावा लागतो, त्यांचा या वार्षिक सर्वेक्षणालाच विरोध आहे. शिक्षणव्यवस्थेत अनागोंदी आहे की नाही? शिक्षण क्षेत्र दुर्लक्षित आहे की नाही? शिक्षणाबाबतची आपली धोरणं शिक्षणतज्ज्ञांपेक्षा बाहेरच्याच व्यक्ती ठरवतात की नाही? शिक्षणाबाबत समानता नाही, हे खरं आहे की नाही? वासारखे प्रश्न विचारले, तर त्यांची उत्तरं त्यांच्याकडूनही होकारार्थीच येतील. पण, या साच्या प्रश्नांचे प्रत्यक्ष परिणाम आकडेवारीतून दाखवायला गेलो, तर मात्र ही आकडेवारी गोळा करण्यातच कशा त्रुटी आहेत किंवा वास्तवाचं भान न ठेवता या सर्वेक्षणाच्या प्रश्नावल्या कशा तयार केल्या जातात आणि त्यामुळे येणारी उत्तरही कशी अर्धसत्य असतात, हे तुम्हाला तावातावाने सांगतील. शिक्षण व्यवस्थेतल्या आबाळीला फक्त शिक्षक किंवा शिक्षण विभाग जबाबदार आहे असं कोणीच म्हणणार नाही; पण जे समोर आलं आहे, त्यातलं न्यूनत्व स्वीकारलं तरच त्यावरच्या उपाययोजनांकडे जाता येईल. जे वास्तव समोर आलं आहे तेच चुकीचं आहे असं म्हटलं, तर सुधारणा करण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच धुरिणांनी अहवालातील निष्कर्ष कसे चुकीचे ठरवता येतील यावर काथ्याकूट करण्यापेक्षा सुधारणांचा आग्रह धरण्यासाठी आपल्या हाती एक नामी हत्यार आलं आहे, यादृष्टीने त्याकडे पाहिलं तर त्यांच्या तक्ररीही आपोआप कमी होतील.



प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतला शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा ही गेल्या काही वर्षातील सर्वाधिक चिंतेची बाब आहे. एका बाजूला शिक्षणाचा प्रसार आणि सार्वत्रिकीकरण होत असताना दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या दजांत होणारी कमालीची घट येत्या काळासाठी संकट ठरू शकते. जगभर तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होते आहे. कृत्रिम बुद्धिमता आणि संपूर्ण यांत्रिकीकरणाने रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. अत्यंत उच्च कौशल्याची गरज असलेले आणि कुशलतेची किंचित गरज असलेले अशा दोनच प्रकारचे रोजगार हे दशक संपेपर्यंत शिल्लक राहतील, असं भाकीत वर्तवलं गेलं आहे. आजघडीला संपूर्ण क्षेत्रात भारतीय झळकताहेत, ते दोन दशकांपूर्वी घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर अमेरिका किंवा युरोपमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्याथ्यांचं प्रमाण आज सर्वाधिक आहे, तेही त्यांनी दशकभरापूर्वी घेतलेल्या शिक्षणामुळेच. पण, त्यानंतर आपल्या शिक्षणाचा दर्जा घसरत गेला असून कोरोनाच्या काळात त्याने नीचतम पातळी गाठली होती हे 'असर'च्या अहवालाने स्पष्ट केलं आहे. शहरांमध्ये असणाऱ्या खाजगी शाळा किंवा ग्रामीण भागातही अपवाद म्हणून दाखवता येतील अशा काही शाळा आहेत. प्रयोगशील शाळा आणि शिक्षकांची संख्याही महाराष्ट्रात कमी नाही. पण, शिक्षण व्यवस्थेचा एकूण पसारा आणि विद्याथ्यांची संख्या पाहता या सगळ्यांची गणना 'प्रायोगिक पातळी' वरच राहते. शिक्षण क्षेत्राला आज खंबीर आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाची गरज आहे. ही गरज एकच व्यक्ती पूर्ण करेल असे नाही. शिक्षण क्षेत्रातील न्यूनत्व दूर करण्याची आस असलेलं याच क्षेत्रातलं नेतृत्व आणि त्याचं महत्व जाणणारे धोरणकर्ते अशी गाठ पडली, तरच काळाच्या आव्हानाला पुरे पडेल, असं शिक्षण घेतलेला विद्यार्थी आपण तयार करू शकू. अन्यथा पुढचे 'असर' यापेक्षा अधिक वाईट चित्र दाखवणारे असतील, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.


कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष शिक्षण अशक्य असल्याने काही काळानंतर ऑनलाईन शिक्षणाचे विविध पर्याय वापरले गेले. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे अशा प्रकारचं शिक्षण हेच भविष्य असलं, तरी ते रूजायलाही काही काळ जावा लागेल. जिथे अजूनही अव्याहत वीज नाही, विनाव्यत्यय इंटरनेट नाही, त्याच्या वेगाचाही प्रश्न आहे अशा 'भारता'मध्ये महिन्या दोन महिन्यात 'ऑनलाईन' शिक्षणाला गोमटी फळं वाचीत अशी अपेक्षा करणं हीच मुळात फसवणूक होती. पण, अशी फसवणूक करावी लागते. सरकारला त्याशिवाय आपला चेहरा जपता येत नाही. कोरोना काळात जे ऑनलाईन शिक्षण झालं, परीक्षा झाल्या, मूल्यमापन झालं आणि विद्यार्थी पुढे पुढे ढकलले गेले, ती आपणच आपली केलेली फसवणूक होती हे स्वीकारून शिक्षण क्षेत्राने आता सरकारकडे त्यातील दुरुस्तीसाठी आग्रह धरला पाहिजे. पाया कच्चा राहिलेल्या या विद्यार्थ्यांना थेट कळसावर नेऊन बसविण्याची घाई करण्याला काही अर्थ नाही. वेगवेगळ्या टण्यावर हे घडलं असल्याने किमान दोन-तीन पिचा त्यामुळे कच्या निपजण्याची शक्यता आहे. नुसत्वा सवलती देत त्यांना पुढे नेत राहण्यापेक्षा वा दोन वर्षातील अभ्यासक्रम पुढील वर्षांमध्ये समाविष्ट करून त्यांची भरपाई कशी करता येईल, याचा विचार करायला हवा. केंद्राने यासंबंधीचं मार्गदर्शक धोरण तयार करून ते राज्यांना द्यायला हवं आणि राज्यांनी आपल्या लेकरांसाठी त्याची काळजीपूर्वक अंमलबजावणी करायला हवी. नुसत्याच रंगसफेतीपेक्षा मूलभूत ढाच्याकडे पाहायला हवं. 'असर'च्या अहवालाने हीच गरज अधोरेखित केली आहे. तिला त्वरीत सकारात्मक प्रतिसाद दिला गेला पाहिजे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...