सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सिमेंटचे रस्ते ४० वर्षे टिकणार; दुकानदारी बंद होणार असल्याने टीका उपमुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईत दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढेच आतापर्यंत सुरू होते. सिमेंटचे रस्ते केल्यास पुढील ४० वर्षे नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. पण ज्यांची संपूर्ण हयातच घोटाळे करण्यात गेली त्यांना सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.



मुंबईत ६ हजार कोटींचे ४०० किमीचे सिमेंटचे रस्ते बांधण्याबाबत निविदा जारी केल्या आहेत. यात लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारने मोठा घोटाळा केला असून, कंत्राट देण्याबाबत सेटिंग झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला.

फडणवीस म्हणाले, ज्यांची संपूर्ण हयात घोटाळे करण्यात गेली, त्यांना मुंबईत सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत आहे. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले, तर पुढील ४० वर्षे नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही.

२०१८ मध्ये जेव्हा मुंबईतील रस्त्यांच्या कामांची चौकशी झाली, तेव्हा येथील शेकडो रस्त्यांमध्ये खालचा थरच नव्हता. गेली २५ वर्षे अशाच प्रकारची कामे केली गेली. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून पैसे खायचे, एवढेच आतापर्यंत सुरू होते. आता त्यांची दुकानदारी बंद होणार असल्याचे लक्षात आल्याने आरोप करण्याचे काम सुरू आहे. पण यांना आता जनताच उत्तर देईल, अशा शब्दांत शिवसेनेला लक्ष्य केले.

'त्या' कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्याच हस्ते ! शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येऊन शिवसेनेने केलेल्या कामांचे उद्घाटन करत असल्याबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मोदी ज्या २ मेट्रो लाईन्सचे उद्घाटन आहेत त्याच्या दोन्ही कामांचे भूमिपूजन मोदी यांच्याच हस्ते २०१५ मध्ये करण्यात आले होते. आता त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. या सर्व कामांच्या परवानग्या केंद्र आणल्या आहेत. हे झोपेत बोलणारे लोक आहेत. यांची टक्केवारी ठरली नाही म्हणून यांनी वर्क ऑर्डर काढली नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाड कारभारावर टीका केली.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आधुनिक पद्धतीची शेती आणि जास्त उत्पन्न

   आधुनिक पद्धतिने शेती  शेती व्यवसाय हा भारताचा महत्त्वाचा कणा मानला जातो कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या आणि बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालतो या व्यवसायामुळे शेतीला आणि शेतीतील व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे शेतीमुळे खूप सारे व्यवसाय उदयाला आले शेती हा व्यवसाय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे यामुळे आताच्या काळाची गरज बनली आहे  उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान बनले आहे   अशा परिस्थितीत वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहित असणे खूप गरजेचे आहे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या  तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी शेतात पीक वाढीसाठी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान माहीत असणे व त्यांचा अवलंब कसा करणे हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे  सध्याच्या काळात जागतिकीकरणाच्या युगामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणे खूपच कठीण झाले आहे दिवसेंदिवस पुरवठा करणे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तसेच आपल्या शेतीचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळात शेत...

राजौरी हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सुपूर्द अमित शाहांची घोषणा, काश्मीरच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या म राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) न सोपवल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केली. याचवेळी संरक्षण दलांचे प्रमुख, नायब राज्यपाल मनोज सिन्हा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी काश्मिरातील सुरक्षा • व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह न यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा एकदिवसाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तपासन एनआयएकडे सोपवला आहे. यासोबतच मागील दीड वर्षात जम्मू-काश्मिरात घडलेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांची चौकशी एनआयए करणार आहे. यात राज्य पोलीस हे एनआयएला सक्रियपणे मदत करणार आहेत. सीमापार दहशतवाद, , पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि चीनसोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर, काश्मीरची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणे व अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यासाठ...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...