शिमला: केंद्रातील सत्तारूढ . भाजप व जातीयवादी आणि फूट पाडणाऱ्या शक्तींविरुद्ध जनतेला एकजूट करण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा काढली असून, त्यास उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा - दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल - गांधी यांनी बुधवारी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात द्वेष, • हिंसाचार व दहशत पसरवली आहे; परंतु संघाच्या मनसुब्यांना आम्ही 1 प्रत्युत्तर देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
कन्याकुमारी येथून काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा हिमाचल प्रदेशात पोहोचली आहे. सीमेवरील घटोटा गावाजवळ पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर व प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंग यांना यात्रेचा ध्वज सोपवला. कडाक्याच्या थंडीतही हिमाचलचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदारांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात्रेचे सहर्ष स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजप व संघावर चौफेर टीका केली. देशातील मूठभर अब्जाधीशांना लाभ पोहोचविणे हा नोटबंदी, जीएसटी व कृषीविरोधी कायद्याचा हेतू होता. या अजेंड्यात शेतकरी, नवयुवक आणि मजुरांचे हित नव्हते. भाजपने बेरोजगारी व महागाईकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनता प्रचंड मेटाकुटीला आल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. संसदेत जनतेच्या मुद्द्यांवर आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यामुळे जनतेमध्ये एकजूट घडवणे व त्यांच्या हिताचे मुद्दे उचलून धरण्यासाठी आम्ही यात्रा काढली आहे.
आम्ही न्यायपालिका व मीडियाद्वारे जनतेच्या मुद्द्यांवर बोलू शकत नाही; कारण हे दोनही स्तंभ भाजपच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पंजाबमध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेत चूक झाली. त्यामुळे हिमाचल प्रदेशात राहुल यांना कडक सुरक्षा कवच दिले. राहुल गांधी यांनी काठगड स्थित ऐतिहासिक शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर राहुल गांधींनी सुमारे २४ कि.मी. पदयात्रा काढली. मालोट गावात राहुल गांधींनी सभेला संबोधित केले.
.png)