सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

राजीनामा घेतला नसता तर भुजबळ जेलमध्ये गेले असते.

 sharad pawar news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ विरुद्ध विधान केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळाचा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ जेलमध्ये गेले असते. असे विधान केलेले आहे. तेलगी प्रकरणावरून शरद पवारांनी आपल्याकडून राजीनामा घेतला पण तेलगी प्रकरणात आपणच विरोध म्हणून कारवाई केली होती. असे अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधल्या सभेत स्पष्ट केले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांना उत्तर दिले.        मी लढण्यासाठी तयार आहे तुम्ही पण राहा आपण जी लढत आहोत ती विचारांची लढाई आहे मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नका लोकांची शक्ती ही आपल्या मागे आहे. आपल्या पक्षावर टीका करणारे अजित पवार गटांकडे लक्ष देऊ नका, असे पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेना बंडखोरांची कधीच होऊ शकत नाही - आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्ष हा बाळासाहेब गटाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू आहे.शुक्रवारच्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाले, निवडणूक ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांचा आहे.  जे बाहेर पडले आहेत, ते गद्दार आहेत. त्यांची शिवसेना कधीच होऊच शकत नाही. देशात सत्यमेव जयते आहे, त्यामुळे सत्याचा म्हणजे आमचाच विजय होणार हे निश्चित आहे. फक्त हा विषय किती दिवस प्रलंबित ठेवणार आणि लांबवणार एवढाच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे आयोगाला लेखी उत्तर आम्ही देऊच; पण गेली सहा ते सात महिने घटनाबाह्य सरकार स्थापन झाले आहे. देशात असे कधीही झाले नव्हते. कायदे तोडून मोडून हे सत्तेत आले आहेत. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी देशाचे, राज्याचे आणि जनतेचे नुकसान होत आहे. असा प्रकार देशाने यापूर्वी कधीच बघितला नव्हता, असेही ते म्हणाले. //

काश्मिरात भरपावसातही भारत जोडो यात्रा

 कठुआ : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हटली मोडवरून भारत जोडो यात्रेचा या राज्यातील प्रवास शुक्रवारी सुरू झाला. काश्मीरमधील यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी पावसानेही हजेरी लावल्यामुळे राहुल गांधींनी प्रथमच आपल्या पांढऱ्या टी-शर्टवर जॅकेट घातले होते आणि त्याचीच चर्चा होती. भारत जोडो यात्रेने गुरुवारी संध्याकाळी पंजाबमधून जम्मू- काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. दोन्ही राज्यांच्या काँग्रेस अध्यक्षांनी ध्वजाचे आदान-प्रदान केल्यानंतर यात्रा सीमेवरच मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी कठुआ जिल्ह्यातील हटली मोडवरून यात्रेचा काश्मीरमधील प्रवास सुरू झाला.  पावसाने व्यत्यय आणला असला तरी राहुल यांनी आपल्या समर्थकांसह यात्रेच्या अखेरच्या टप्प्याला उत्साहात सुरुवात केली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राज्यसभा खासदार संजय राऊत यात्रेत सहभागी झाले. देशातील वातावरण वेगाने बदलत असून, लोक त्यांचा नेता ठरवतील, असे राऊत म्हणाले. राज्यातील इतर नेतेही यात्रेत सहभागी झाले. जम्मू- पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या यात्रेला बघण्यासाठी काश...

निकालाचा 'बाण' भात्यातच ३० जानेवारीपर्यंत लेखी भूमिका मांडण्याचे आयोगाचे निर्देश

 नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेवर दावा करत सुरू केलेला शिवसेना कोणाची, हा वाद म्हणजे देशाच्या संसदीय व्यवस्थेची थट्टा आहे, असा घणाघात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गट हा राजकीय पक्ष नसल्याने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच बेकायदा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. तर घटनेचे पालन करूनच आम्ही सर्व नियुक्त्या केल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी येत्या ३० जानेवारीपर्यंत लेखी शिवसेना भूमिका मांडण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ? याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून अजूनही निकालाचा बाण भात्यातच आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होत असल्याने आता या पदाचे काय, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या मुद्दयावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शुक्रवारीदेखील निर्णय होऊ शकला नाही. सर्वप्रथम ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटनाच...

भारत व्यापारासाठी नेहमीच खुला !

 दावोस: भारत तसेच देशाचे सरकार व्यवसायासाठी सदैव तयार आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी सांगितले. त्यांनी परदेशी कंपन्यांना देशाच्या अफाट क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या वार्षिक बैठक - २०२३ च्या पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि सल्लागार फर्म डेलॉइट यांनी आयोजित केलेल्या सत्राला त्या संबोधित करत होत्या. स्मृती इराणी म्हणाल्या की,महिलांना खूप फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील NDI प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय आम्ही उद्योग आणि इतर सर्वांसोबत एकत्र काम करण्यावर आमचा विश्वास आहे. भारत आयुष्मान भारतच्या रूपाने जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा चालवतो. या अंतर्गत १० कोटी कुटुंबे येतात. भौगोलिक सीमा ओलांडून आरोग्य सुविधा पुरवण्यात येते.  या योजनेचा करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. जग जेव्हा करोडो लोकांना पुन्हा कौशल्य देण्याची गरज बोलतो, तेव्हा केवळ भारतच ते लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. भारताने स्वदेशी कोविड लस विकसित करण्यासाठी इतर देशांसोबत सहकार्य केले; परंतु ते व्...

राखी सावंत हिची चार तास चौकशी एका अभिनेत्रीची आक्षेपार्ह क्लिप प्रसारित केल्याचा आरोप

 दाखल करण्यात आली असून त्याबाबत अंबोली पोलिसांनी गुरुवारी तिची चौकशी केली.  मुंबई : विचित्र विधाने आणि सावंत हिच्याविरोधात तक्रार वर्तनामुळे सातत्याने वादांच्या लाटांवर असणारी अभिनेत्री राखी सावंत समाजमाध्यमांतील एका पोस्टमुळे अडचणीत आली आहे. एका बॉलीवूड अभिनेत्रीसंबंधीच्या आक्षेपार्ह चित्रफितीची लिंक आणि छायाचित्रे प्रसिद्ध केल्याप्रकरणी राखी चित्रपट अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने तिच्या ट्विटर खात्यावरून राखी सावंतविरोधातील एफआयआरची माहिती देऊन तिला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली होती. मात्र अंबोली पोलिसांनी राखी सावंत हिची सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात येते. राखी सावंत हिने चौकशीत सहकार्य केल्याने तसेच तिचा मोबाईल फोन अधिक तपासासाठी पोलिसांच्या हवाली केल्याने तिला तातडीने अटक करण्याचे कोणतेही कारण नव्हेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय तपासणीला परवानगी एनआयएच्या याचिकेवर विशेष न्यायालयाचे आदेश

मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. त्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करून शर्मा यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत सर्वसमावेशक अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि गाडीचे मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १७ जून २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. शर्मा गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.  त्यांची वैद्यकीय अँटिलिया बॉम्ब प्रकरण तपासणी करण्याची मागणी करणारा अर्ज एनआयएने गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात केला आहे. शर्मा यांना कोणताही आजार नसून ते तंदुरुस्त आहेत. आजारपणाच्या नावाखाली ते सरकारी रुग्णालयाचा गैरवापर करत असल्याचा दावा एनआयएने केला. हा दावा शर्मा यांनी फेटाळून लावला. त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय...

कोरोनाचा असर

 कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचे, जादा खर्चाचे; त्यातल्या भ्रष्टाचाराचे अनेक आकडे समोर आले. या काळात आरोग्यव्यवस्थेवर आलेला ताण आणि त्यातील कमतरतेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यांवरूनही बरीच भवति न भवति झाली. पण, त्या दोन वर्षांत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवल्याने विद्यार्थ्याचं किती नुकसान झालं याची आकडेवारी समोर आली नव्हती. बुधवारी जाहीर झालेल्या 'असर' अहवालाने आपल्या भावी पिढीवर त्या 'लॉकडाऊन'चा नेमका काय असर पडला, हे आता समोर आले आहे. 'असर'चा अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो आणि त्यातून आपल्या शिक्षणव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली जातात. ज्यांना ही आकडेवारी अडचणीची वाटते किंवा ज्यांना आपल्या बेफिकीरीचा पुरावा म्हणून तो पाहावा लागतो, त्यांचा या वार्षिक सर्वेक्षणालाच विरोध आहे. शिक्षणव्यवस्थेत अनागोंदी आहे की नाही? शिक्षण क्षेत्र दुर्लक्षित आहे की नाही? शिक्षणाबाबतची आपली धोरणं शिक्षणतज्ज्ञांपेक्षा बाहेरच्याच व्यक्ती ठरवतात की नाही? शिक्षणाबाबत समानता नाही, हे खरं आहे की नाही? वासारखे प्रश्न विचारले, तर त्यांची उत्तरं त्यांच्याकडूनही होकारार्थीच येतील. पण, या सा...

आयटी नियम दुरुस्तीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला - काँग्रेस

 नवी दिल्ली : केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमात दुरुस्ती करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर छुप्या पद्धतीने केलेला हल्ला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया देत काँग्रेसने गुरुवारी त्यास तीव्र विरोध दर्शवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेच्या मनावर स्वतःची प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. आयटी अधिनियम दुरुस्ती मागे घेण्यात यावा व त्यावर संसदेत विस्तृत चर्चा करण्याची मागणीही काँग्रेसने केली. 'माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ दिशानिर्देश व डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम- २०२१ दुरुस्ती मसुदा' माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकताच सादर केला. यात फेक न्यूज हटवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे. माहिती हा तर स्वतःची प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्नव प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयाने पुष्टी केल्यानंतर संबंधित फेक न्यूज बातमी मागे घेता येणार आहे; परंतु हा नवा बदल झाल्याने फेक न्यूजच्या नावाखाली इतर बातम्या दडपल्या जातील व सर्वच अधिकार केंद्र सरकारच्या हाती एकवटतील, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.  इंटरनेटच...

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी धास्तावले राहुल गांधी काँग्रेसने कल्याणकारी योजनांतून जनतेची भीती दूर केली

 पठाणकोट: मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. यूपीए सरकारने मनरेगा योजना आणली. यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, शहर विकास मिशन, हरित व श्वेतक्रांती घडवत जनतेच्या मनातील भीती दूर केली, असा दावा त्यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार दिल्लीतील रिमोट कंट्रोलनुसार चालत असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' गुरुवारी पंजाबमधील पठाणकोट शहरात पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी सभेला संबोधित करीत प्रतिद्वंदी भाजप व आम आदमी पक्षावर हल्ला चढवला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात द्वेष, हिंसाचार व भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जात व धर्म व भाषेच्या आधारे भांडण लावण्याचे कार्य त्यांनी केले.  केंद्र सरकारच्या सर्वच योजना भीतिदायक असतात. प्रत्यक्षात त्याचा कोणालाही लाभ मिळत नाही. नवे कृषी कायदेसुद्धा तसेच होते. याउलट यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मनरेगा, शहर विकास मिशन, हरित व श्वेतक्रां...

महाराष्ट्रात पोटनिवडणूक जाहीर कसबापेठ, चिंचवडसाठी २७ फेब्रुवारीला मतदान २ मार्चला मतमोजणी

 मुंबई : भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे पुण्यातील कसबापेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी पोटनिवडणूक घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी २ मार्चला होणार आहे. IMG credit to pexal.com निर्णयाकडे लक्ष निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीच्या पोटनिवडणुकीच्या पूर्ण कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे. त्यानुसार, या पोटनिवडणुकीची अधिसूचना ३१ जानेवारीला जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी अशी असून, ८ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १० फेब्रुवारी २०२३ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने या दोन्ही मतदारसंघांत आचारसंहिता लागू झाली आहे. कसबापेठच्या आ. मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी, तर लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले होते. शिवसेना (ठाकरे) आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेण्यात आली. या...

भाजपविरोधात एकजूट घडवण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली - राहुल

 शिमला: केंद्रातील सत्तारूढ . भाजप व जातीयवादी आणि फूट पाडणाऱ्या शक्तींविरुद्ध जनतेला एकजूट करण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा काढली असून, त्यास उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा - दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल - गांधी यांनी बुधवारी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात द्वेष, • हिंसाचार व दहशत पसरवली आहे;  परंतु संघाच्या मनसुब्यांना आम्ही 1 प्रत्युत्तर देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. कन्याकुमारी येथून काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा हिमाचल प्रदेशात पोहोचली आहे. सीमेवरील घटोटा गावाजवळ पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर व प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंग यांना यात्रेचा ध्वज सोपवला. कडाक्याच्या थंडीतही हिमाचलचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदारांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात्रेचे सहर्ष स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत भाजप व संघावर चौफेर टीका केली. देशातील मूठभर अब्जाधीशांना लाभ पोहोचविणे हा नोटबंदी, जीएसटी व कृषीविरोधी कायद्याचा हेतू होता. या अजेंड्यात शेतकरी, ...

सिमेंटचे रस्ते ४० वर्षे टिकणार; दुकानदारी बंद होणार असल्याने टीका उपमुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईत दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढेच आतापर्यंत सुरू होते. सिमेंटचे रस्ते केल्यास पुढील ४० वर्षे नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. पण ज्यांची संपूर्ण हयातच घोटाळे करण्यात गेली त्यांना सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुंबईत ६ हजार कोटींचे ४०० किमीचे सिमेंटचे रस्ते बांधण्याबाबत निविदा जारी केल्या आहेत. यात लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारने मोठा घोटाळा केला असून, कंत्राट देण्याबाबत सेटिंग झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, ज्यांची संपूर्ण हयात घोटाळे करण्यात गेली, त्यांना मुंबईत सिमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख होत...

पाकमध्ये संपत्तीचा खुलासा न करणारे २७१ आमदार-खासदार निलंबित निवडणूक आयोगाची कारवाई

 इस्लामाबाद : वारंवार ताकीद दिल्यानंतरही स्वतःकडील संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या सुमारे २७१ आमदार व खासदारांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ईसीपी) मंगळवारी निलंबित केले आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीचे १३६ व सिनेट सभागृहाचे २१ खासदार आणि राज्य विधानसभेतील ११४ आमदारांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईमुळे लोकप्रतिनिधींना मोठा दणका बसला आहे. देशातील खासदार व आमदारांना स्वतःकडील संपत्ती व आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंतची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. त्यानंतर काही कारणास्तव हीच मुदत १६ जानेवारी, २०२३ पर्यंत वाढवण्यात ELECTION COMMISSION PAKISTAN आली; परंतु तरीही बहुतांश लोकप्रतिनिधींनी आयोगाचे आदेश पाळले नाहीत. संपत्तीचा खुलासा करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारत देशभरातील सुमारे २७१ आमदार व खासदारांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. संपत्ती जाहीर न करणाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा आयोगाने अनेकदा दिला होता; मात्र त्याकडे २७१ आमदार व खासदारांनी क...

वीजदर निश्चितीसाठी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची ग्राहकांची मागणी नियामक आयोगाला निवेदन पाठवण्याचे ग्राहक संघटनेचे आवाहन

  मुंबई : महावितरणची वीजदर निश्चितीसाठी सुनावणीबाबत जाहिरात यायला अजून कालावधी असल्यानेच वीज ग्राहकांनी ई-हीयरिंग नको, नेहमीप्रमाणे जाहीर प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, यासाठी आठवडाभरात निवेदन देण्याचे आवाहन वीज ग्राहक संघटनेने वीज ग्राहकांना केले आहे. तसेच सर्व वीज संघटना, ग्राहक प्रतिनिधी व किमान मोठे ग्राहक यांनी शेकडो ईमेल वा पत्रे, निवेदनांबरोबर चस्थानिक आमदार, खासदार व मंत्र्यांनाही निवेदन द्यावे.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी सुनावणीबाबत बोलण्यासाठी आग्रह धरावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रामधील वीज ग्राहकांच्या सूचना, हरकती, अनुभव, व्यथा व वेदना जाहीररीत्या आयोगासमोर मांडण्याचे न्याय्य हक्क सुरक्षित व सुरळीत चालू ठेवण्यासाठी महावितरणच्या विभागीय जाहीर सुनावण्या नेहमीप्रमाणे आयोजित करण्यासाठी वीज ग्राहक संघटनेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर महावितरण कंपनीने येणाऱ्या दोन वर्षांच्या वीजदर निश्चितीसाठी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. नेहमीच्या पद्धतीनुसार येत्या ८-१० दिवसात ही याचिका वर्तमानपत्रातून जाहीर होणे व त्यानंतर राज्यात विभा...

ऐश्वर्या राय-बच्चन यांना तहसीलदारांची नोटीस

 सिन्नर : तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी शिवारातील जमिनीचा अकृषक कर भरण्याबाबत सिन्नरच्या तहसलीदारांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यासह तालुक्यातील १२०० मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित कराचा भरणा करण्यात येणार असल्याचे ऐश्वर्या राय यांच्या वतीने कळवण्यात आले आहे. ऐश्वर्या राय यांनी सन २००७- ०८ मध्ये आडवाडी शिवारात गट क्रमांक १२६ मधील १ हेक्टर २२ आर जमीन स्वतःच्या नावावर घेतली असून सध्या त्या जमिनीवर सुझलॉन पॉवर कंपनीची पवनचक्की आहे. त्याचप्रमाणे आणखी काही कंपन्यांच्या पवनचक्क्याही या परिसरात आहेत. राय यांच्या जमिनीचा सन २०२२-२३ चा २१ हजार ९६० रुपये इतका अकृषक कर भरण्याची नोटीस ऐश्वर्या राय बच्चन प्रोप्रा. फर्म या नावाने काढण्यात आली असून नोटिसीचा खर्च म्हणून १० रुपयांची आकारणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अधिनियमान्वये खातेदारास नमुना १ अंतर्गत ही सिन्नरमधील जमिनीचा अकृषक कर भरण्याची सूचना नोटीस बजावण्यात आल्याचे तहसीलदार एकनाथ भंगाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  ९ जानेवारी रोजी ही नोटीस बजावण्यात...

२०२४ च्या लोकसभेसाठी भाजपची धुरा नड्डांच्याच हाती ॥ पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला

 नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४पर्यंत वाढवण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कार्यकारिणीने सामाजिक व आर्थिक ठराव मंजूर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक ठराव मांडला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपाध्यक्ष म्हणून नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. हा प्रस्ताव सर्वसंमती मंजूर करण्यात आल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजप अधिक लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे.  जनसंघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत भाजपमध्ये बूथ पातळीसह राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पक्षाच्या राज्यघटनेनुसार झाली आहे, असे शाह म्हणाले. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या निवड...

संजय राऊतांच्या 'त्या' विधानाने डॉक्टर नाराज उपचार

उद्धव ठाकरेंनी दखल घेऊन काढली समजूत  कल्याण : विरोधी पक्षावर टीका करण्याच्या नादात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी कोविड काळामधील डॉक्टर आणि नर्सच्या सेवेबाबत केलेल्या विधानावरून डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला. आयएमएसह कल्याणमधील प्रमुख वैद्यकीय संघटनांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्यावर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्याची गंभीर दखल घेत डॉक्टरांची समजूत काढली. खा. संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना 'कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले' असे विधान केले. राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत या वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी तर उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून राऊत यांच्या वक्तव्यावर आपली नाराजी जाहीर प्रकट केली. आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्याशी संपर्क साधून खा. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर परखड निषेध नोंदवला. त्यांचे...

महागड्या तेलाने एसटीचे अर्थचक्र खोलात !

मुंबई : एसटी महामंडळाला विविध सरकारी पेट्रोलियम कंपन्यांतर्फे पुरवण्यात येणाऱ्या डिझेलसाठी खासगी पेट्रोल पंपांवरील डिझेलच्या दराच्या तुलनेत लिटरमागे अतिरिक्त २२ ते २३ रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या एसटीला आणखी संकटात ढकलले गेले आहे. दर म्यान, सार्वजनिक परिवहन सेवा असताना केंद्राची मालकी सरकारी आणि खासगी तेलकंपन्यांच्या दरात तफावत ॥ महामंडळाचा खासगी खरेदीचा निर्णय असलेल्या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून एसटीला इतरांहून स्वस्त डिझेल पुरवण्याऐवजी महाग दराने कसे पुरवले जाते? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी असणाऱ्या लालपरी एसटीचे कोरोना काळात उत्पन्न घटले. त्यानंतर एसटी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे.  कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटीला सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची वेळ आली एसटी महामंडळाने विभागात डिझेल भरण्यासाठी आगारातील बसेसच्या वेळापत्रकाचा विचार करून नजीकच्या सोयीस्कर पंपाची निवड करण्यात यावी, त्यामुळे डिझेल अभावी बसेस बंद राहण्याचा धोका टळेल, असे अधिकाऱ्यांन...